गौरी गणपतीचे मुखवटे बाजारात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:17+5:302021-09-11T04:37:17+5:30
यंदाही श्री महालक्ष्मीचा सन सलग तीन दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे़ या उत्सवाला शनिवारी स्थापना केली जाणार असल्याने ...

गौरी गणपतीचे मुखवटे बाजारात दाखल
यंदाही श्री महालक्ष्मीचा सन सलग तीन दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे़ या उत्सवाला शनिवारी स्थापना केली जाणार असल्याने बाजारातून भक्तांनी धातूची मूर्ती, मातीची मूर्ती, कागदावरचे चित्र व पाच लहान खडे अथवा मुखवटे खरेदी केले आहेत़ दोन दिवस रात्रभर जागरण करून महिला गौरी उत्सव उत्साहाने साजरा करतात़ यावेळी गौरी व महालक्ष्मीची महती सांगणारी पांरपरिक गीते गायली जातात़
असा असतो देवीला नैवेद्य
गौरी स्थापनेनंतर देवीसमोर विविध पदार्थ त्यात लाडू, करंजी, शंकरपाळे, खारीक, खोबरे ठेवले जाते़ सकाळी महिलांनी जरीची वस्त्रे परिधान करून गौरीसमोर अखंड नंदादीप ठेवला जातो़ दोन गौरींमध्ये गणपती बाप्पा यांना बसविले जाते.
सोळा पालेभाज्यांचे महत्व
पूजन व भोजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो़ यावेळी आरोग्यदायी १६ विविध पालेभाज्यांना विशेष महत्व असते़ गौरीच्या नैवेद्यामध्ये एकूण १६ प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो.
गौरीस्थापना केल्यानंतर गौरीसमोर विविध पदार्थ ठेवले जातात़ देवीचा महानैवेद्य सकाळी प्रसाद म्हणून घेतात. या दिवशी कानवले आणि खीर यांचा नैवेद्य दाखवून गौरीला प्रेमाचा निरोप दिला जाणार आहे़ शेवटी घरातील प्रमुख व्यक्ती गौरीचे मुकुट धान्याच्या राशीवर ठेवतात. गौरी उत्सव श्री महालक्ष्मीचा तीन दिवसांचा सण सर्व मिळून एकोप्याने व आनंदाने उत्सव साजरा करण्यात येतो़
असा होतो साजरा
गौरीच्या स्थानासमोर गहू, तांदूळ, चकली, कडधान्य, करंज्या, आदी साहित्याचा नैवेद्य दाखविण्यात येतात़ गौरी हे महालक्ष्मीचे रूप असून उत्सवात महालक्ष्मीला दागिन्यांनी सजविण्यात येते़ यावेळी गौरीच्या अंगावर एकदाणी मोत्यांच्या हार, ठुशी, लक्ष्मीहार, वाकी, बाजुबंद पट्टा, मोत्यांचे हार, कमर पट्टा, बाजूबंद हार, गौरी मुकूट, नथ आदी दानिग्यांनी सजविण्यात येते़