धुळ्यात गॅसचा भडका, सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:09 IST2019-05-07T13:08:08+5:302019-05-07T13:09:19+5:30

मंगळवारी सकाळची घटना : भाजल्याने चौघे रुग्णालयात दाखल

Gas leakage in Dhule, luckily, survived | धुळ्यात गॅसचा भडका, सुदैवाने जिवीतहानी टळली

धुळ्यात गॅसचा भडका, सुदैवाने जिवीतहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूर भागातील गल्ली नंबर ७ एकवीरा देवी मंदिराजवळील एका घरात अचानक गॅसचा भडका उडाला़ ही घटना मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात चार जणं भाजले गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़  
स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका उडाल्याने सर्वांची धांदल उडाली़ मदतीसाठी या भागातील नागरीकांनी धाव घेतली़ निर्मलाबाई लालचंद भोई (५०), अक्षय लालचंद भोई (२८), विष्णू लालचंद भोई (३३) आणि सुधाकर ज्ञानेश्वर जोशी (४०) हे चौघे भाजले गेल्याने त्यांना खासगी वाहनाने सुदाम परशुराम भोई यांनी तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु आहे़ अक्षयतृतीया सणाच्या दिवशीच अशी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ 

Web Title: Gas leakage in Dhule, luckily, survived

टॅग्स :Dhuleधुळे