कचरा डेपोला लागली पुन्हा आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:39 IST2019-11-22T22:38:45+5:302019-11-22T22:39:06+5:30
महापालिका : वरखेडी रोडवर गंभीर स्थिती, धुरामुळे जाणवतोय सर्वांना त्रास

कचरा डेपोला लागली पुन्हा आग
धुळे : शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागली़ शुक्रवारी दुपारपर्यंत आगीच्या ज्वाला आणि धूर निघत असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला़
कचरा डेपोला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे़ हा विरोध वेळोवेळी नागरिकांनी महापालिकेकडे व्यक्त केला आहे़ आगीच्या धुरामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही़ त्यामुळे अनेक अपघात झाले आहे़ तर काहींना जीवदेखील गमवावा लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मनपास कचरा टाकण्यासाठी दुसरा पर्याय नाही़ त्यामुळे संपूर्ण शहराचा कचरा येथे टाकला जातो़ कचरा जास्त व जागेचा अभाव यातून मार्ग निघावा यासाठी आग लावली जात असावी, अशी शक्यता आहे़ त्यामुळे कचरा जळून कमी झाल्यावर जागेची अडचण दूर होते़ त्यामुळे बाराही महिने धगधगणाºया कचरा डेपोचे आगीचे कारण गुलदस्त्यात असल्याचे समोर येत आहे़ वरखेडी गावापासून दोन-तीन किमी अंतरावरील डेपोला नागरिकांचा विरोध असतानाही मनपाने नागरिकांचे प्रश्न न सोडविता दुर्लक्ष केले आहे़ परिसरात कचरा डेपोमुळे सतत जाणवणारी तीव्र दुर्गंधी, दूषित झालेले पाणी व डेपोवर कायम वावरणाºया मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते़ डेपोजवळ दिव्यांची व्यवस्था नाही. शहर परिसरातील मृत जनावरेही येथे आणून टाकली जातात. कचरा डेपोला बाराही महिने आग लागतेच कशी? हे समजू शकलेले नाही़ आतापर्यंत किती वेळा आग लागली असावी, याबाबत कुठलीही नोंद नाही़
समस्या कधी सुटणाऱ़़
पूर्वीच्या काळी कचरा डेपोमध्ये इतक्या प्रमाणावर कचरा संकलन होत नव्हता़ पण, सध्याच्या काळात शहराचा वाढणार विस्तार लक्षात घेता याच कचºयाच्या डेपोमध्ये त्याचे प्रमाण कितीतरी पटीने वाढलेले दिसते़ याचा सर्वाधिक त्रास या रस्त्यावरून वावरणाºया नागरिकांना आणि याच परिसरात राहणाºया नागरिकांना भोगावा लागत आहे़