साक्री कॉँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी गांगुर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:30 IST2020-02-01T12:29:44+5:302020-02-01T12:30:42+5:30
शहराध्यक्षपदी : सचिन सोनवणे यांची निवड

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : कॉँग्रेसच्या साक्री तालुकाध्यक्षपदी भानुदास गांगुर्डे यांची तर कार्याध्यक्षपदी दीपक साळुंखे यांची तसेच शहराध्यक्षपदी सचिन सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यातील काँग्रेसचे बहुसंख्य नेते व कार्यकर्ते भाजपत गेलेले असतानाही साक्री तालुक्यातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता. भानुदास गांगुर्डे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही कॉंग्रेस उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याचीच परिणीती म्हणून साक्री पंचायत समितीवर महाआघाडीचे सत्ता आली आहे. काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या भानुदास गांगुर्डे हे साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीवर ही संचालक आहेत.
प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळेस माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी.एस.अहिरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीचे स्वागत होत आहे.