ग्रामस्थांची गांधिगिरी, रस्त्यातील खड्यांची केली पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:05 IST2020-07-17T12:05:36+5:302020-07-17T12:05:56+5:30
पं.स.सदस्य : जीव गेल्यास संबंधित विभागास दोषी धरु

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : निजामपूर जैताणे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी वर मोठ-मोठे खड्डे पडलेत.तक्रारी करूनही खड्डे दुरूस्त केले जात नसल्याने अखेर ग्रामस्थांनी गांधिगिरी करीत, बुधवारी सायंकाळी जैताणे पं.स. सदस्य अशोक मुजगे आणि ग्रामस्थांनी खड्डयांचे पूजन व नारळ वाढवून प्रशासनाचा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जाहीर निषेध केला.
शेवाळी ते गुजरातमधील नेत्रनपर्यंत मंजूर झालेल्या या महामार्गाची देखभाल होत नसल्याने रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले असून रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे.
स्टेट बँक चौकापासून ते खुडाणे चौफुलीपर्यंत पावसाचे पाणी साचून डबकी झाली आहेत. कृत्रिम नाल्याची देखील दुरुस्ती झालेली नाही. परिणामी याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढते आहे. यात दुचाकी वाहने, चारचाकी वाहने आदळले जाातत. वेळप्रसंगी कुणाचा जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
अशोक मुजगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देखील या समस्येविषयी त्यांनी तक्रार आहे. मात्र अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही.
या ठिकाणी जर एखादा मोठा अपघात झाला तर यास जैताणे व निजामपूर गावातील स्थानिक प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया पं.स.सदस्य अशोक मुजगे यांनी व्यक्त केली आहे.