फुटलेल्या बंधाऱ्यांचे भवितव्य अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:39 IST2019-11-15T11:39:08+5:302019-11-15T11:39:52+5:30
भात नदीचे पाणी वाहून चालले : पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी एकमेव जलस्त्रोत

Dhule
तिसगाव-ढंडाणे : नगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिसगाव येथील भात नदीवर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे दोन बंधारे फुटून महिना उलटला आहे. मात्र या प्रकरणी साधी चौकशी करण्याचे सौजन्यही या विभागाने आतापर्यंत दाखविलेले नाही. महिनाभरापासून नदीतील पाणी अक्षरश: वाहून जात आहे. या संपूर्ण परिसरात या बंधाऱ्यांव्यतिरिक्त एकही जलस्त्रोत नाही. त्यामुळे पुढील काळात पिण्यासाठी तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाणी कोठून उपलब्ध होणार, असा यक्ष प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा आहे.
या परिसरात गेल्या दीड-दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आता नदीतील हे सर्व पाणी डोळ्यादेखत वाहून जात असल्याने परिसरातील जुन्या जाणत्या ते तरुण शेतकºयापर्यंत सारेच अस्वस्थ आहेत. लघुसिंचन विभागाने आता वेळ न दवडता या बंधाºयांचे बांधकाम करून वाहून जाणारे पाणी कसे अडविता येईल, यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
भात नदीवरील टकाºया वस्तीवर असलेले व तिसगाव आणि ढंडाने या दोन्ही गावांच्या वरच्या बाजूस असलेल्या या बंधाºयांवर आजूबाजूला असलेल्या सुमारे ४० ते ५० विहिरी अवलंबून आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र भिजते. एकीकडे या परिसरातील शेतकºयांनी गेल्या दुष्काळ परिस्थितीत पाण्यासाठी खूप भटकंती केली आहे. मग ती पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीसाठी असेल, अशा सर्व परिस्थितीमुळे शेतकरी व ग्रामस्थ त्यात होरपळून निघाले होते. त्यामुळे त्यांना पाणी व जलस्त्रोताचे महत्त्व निश्चित कळलेले आहे. पण ज्यांच्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे त्या संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनीच याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२०१६-१७ मध्ये जलयुक्त योजनेंतर्गत येथील साठवण बंधाºयाची दुरुस्ती व खोलीकरण कामाचा प्रस्ताव होता. परंतु संबंधित अधिकाºयांनी दुसरीकडेच काम पूर्ण केले. जेथे काम केले तो परिसर या लघुसिंंचन विभागाच्या अखत्यारीतही येत नाही, असे शेतकरी छोटू साहेबराव पाटील, छोटू हटकर, दीपक पाटील, अनिल लांडगे, विशाल भामरे, नामदेव भिल, डोंगर पाटील, युवराज भगत, सुभाष नामदेव पाटील, बापू भामरे, जितेंद्र सुदाम पाटील, सुनील पाटील, भानुदास पाटील आदींनी सांगितले. पाणी पूर्णपणे वाहून जाण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा येथील शेतकरी, ग्रामस्थांनी घेतला आहे.