निजामपूर गावाबाहेरील वळण रस्त्यासाठी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:49 IST2020-03-13T12:48:06+5:302020-03-13T12:49:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निजामपूर : सरवड, लामकानी, निजामपुर, ब्राम्हणवेल, कोंडाईबारी या राज्य मार्ग १३ च्या बाह्य वळण रस्त्याच्या कामासाठी ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : सरवड, लामकानी, निजामपुर, ब्राम्हणवेल, कोंडाईबारी या राज्य मार्ग १३ च्या बाह्य वळण रस्त्याच्या कामासाठी अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात काही प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री दादा भूसे यांनी निजामपूर येथे सभेनंतर पहाणी करुन याबाबत आश्वासन दिले होते.
कुठलाही महामार्ग गावाच्या मध्यवस्तीतून न नेण्याचे शासन धोरण असल्याने या महामार्गावरील अवजड वाहने निजामपूर गावाजवळील वळण रस्त्यावरून वळवावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक महिन्यांपासून शासनाकडे होत होती. त्यानुसार निजामपूर गावाच्या पूर्वेकडून लालबारीच्या माथ्यापर्यंत दोन- अडीच कि.मी.च्या बाह्य वळण रस्त्याचा सर्वे करण्यात आला होता. संबंधित विभागाने प्रस्तावही पाठविला होता. सन २०२०-२१ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात हा प्रस्ताव समाविष्ट झाला असून काही निधीची तरतूद झाली. मंत्री दादा भुसे, आमदार मंजुळा गावीत, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भुपेश शाह, मिलिंद भार्गव यांच्या प्रयत्नामुळे प्रस्तावासाठी निधी उपलब्ध झाला आहे. अपेक्षित उर्वरित निधीही लवकरच मिळेल, असे मंत्री भुसे यांनी सांगितल्याचे भुपेश शाह यांनी सांगितले.