फरार दिनू डॉन पोलिसांच्या जाळ्यात

By देवेंद्र पाठक | Updated: June 30, 2023 17:18 IST2023-06-30T17:18:11+5:302023-06-30T17:18:20+5:30

धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाला पाच हजारांचे रोख बक्षीस देऊन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कौतुक केले आहे.

Fugitive Dinu Don arrest by police | फरार दिनू डॉन पोलिसांच्या जाळ्यात

फरार दिनू डॉन पोलिसांच्या जाळ्यात

धुळे : बनावट दारूची निर्मिती व अवैध दारू वाहतूक केल्याच्या आरोपाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्यात दिनू डॉन अर्थात दिनेश निंबा गायकवाड (वय ५२, रा. शिरुड ता. धुळे) याला परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून शिताफीने अटक केली. त्याच्या विरोधात दारूविषयी धुळे जिल्ह्यात १० आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाला पाच हजारांचे रोख बक्षीस देऊन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Fugitive Dinu Don arrest by police

टॅग्स :Dhuleधुळे