संतप्त ग्रामस्थांचा सरपंचाच्या घरावर मोर्चा

By Admin | Updated: June 7, 2017 12:54 IST2017-06-07T12:54:22+5:302017-06-07T12:54:22+5:30

शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी चक्क सरपंचाच्या घरावरच मोर्चा काढला.

Front of the angry villagers Sarpanch's house | संतप्त ग्रामस्थांचा सरपंचाच्या घरावर मोर्चा

संतप्त ग्रामस्थांचा सरपंचाच्या घरावर मोर्चा

>ऑनलाईन लोकमत
दोंडाईचा,दि.7 -  शिंदखेडा तालुक्यातील रामी गावात पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी चक्क सरपंचाच्या घरावरच मोर्चा काढला. यावेळी शिंदखेडा पोलिसांनी मध्यस्ती करत सरपंचांनी नियमित पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. 
रामी गावात पाणी टंचाईमुळे साहेबराव माळी यांची बोअरवेल अधिग्रहित केली आहे. परंतु, या बोअरमधून पाणी पुरवठा बंद करण्यात आले आहे. परिणामी, गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून दोन महिन्यांपासून ग्रामस्थ त्रस्त आहेत. परिणामी, संतप्त ग्रामस्थांनी आज सरपंच योगीता बापू महाजन यांच्या घरावर मोर्चा नेला. 

Web Title: Front of the angry villagers Sarpanch's house