प्रसृतीसह सर्व शस्त्रक्रिया रूग्णांना मोफ त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:17 IST2020-06-10T23:16:51+5:302020-06-10T23:17:22+5:30
कोरोनावर निर्णय : जवाहर फाऊडेशनचा उपक्रम ; जिल्ह्यातील रूग्णांना मिळले दिलासा

dhule
धुळे : लॉकडाउनच्या परिस्थितीतही जिल्हयातील रूग्णांचे हाल होवू नयेत यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पटिल पूर्ण क्षमतेने आरोग्य़ सेवा देत आहे. सर्वच प्रकारच्या रूग्णांवर नाममात्र दरात येथे उपचार होत असून आता प्रसुती, सीजर, संतती नियमनसह सर्व सर्जरी यासह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे.
जिल्हयातील नागरिकांना जास्तीत जास्त़ चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे प्रामाणिक प्रयत्न होत आहेत. ५५० बेडच्या विस्तीर्ण हॉस्पीटलमध्ये रूग्णांवर नामामत्र दरात उपचार केले जात आहेत. फाउंडेशनमध्ये प्रसुती, सीजर, जनरल शस्त्रक्रिया, संततीनियमन, हाडांच्या शस्त्रक्रिया, मूतखडयाचे विकार, मूत्रविकार, दातांशी निगडीत आदी सर्वच शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी एकही रूपया खर्च येणार नाही. दरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष योजनेत बसणाऱ्या रूग्णांना शस्त्रक्रियेबरोबर, औषधे, जेवण, उपचार आदी सर्वच सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. आज उपचारांसाठी मोठा खर्च होत असतांना जवाहर मेडिकल फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे.
निष्णात डॉक्टरांकडून शस्त्र क्रियेबरोबरच विविध उपचार याठिकाणी केले जात आहेत. या सर्व मोफत शस्त्रक्रियांचा जिल्हयातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवाहर मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, आमदार कुणाल पाटील, संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, डॉ. विजय पाटील आदींनी केले आहे.
सर्वच शासकीय योजना लागू
रूग्णालयात महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, आयुष योजना, प्रसुत होणाºया महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, महापालिकेच्या क्षेत्रातील महिलांना मोफत युएसजी सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ मिळत आहे. जवाहर फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल रूग्णांलयात रूग्णांना व नातेवाईकांना केवळ ५ रूपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दररोज २०० थाळयांचा लाभ गरजूंना होत आहे.