शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

रेशन कार्ड नसलेल्या शहरातील कुटुंबांनाही मोफत तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:49 IST

पुरवठा विभाग : स्वस्त धान्य दुकानांमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन, केशरी कार्डधारकांना लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिका क्षेत्रात रेशनकार्ड नसलेल्या कुटूंबांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ दिला जाणार आहे़ त्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे़ तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळाचा लाभ मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे़राज्य शासनाने १९ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, अशा दुर्बल, विस्थापित मजूर, रोजंदारी करणाऱ्या मजुरांना मे व जून या दोन महिन्यांसाठी प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनांतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत. अशा नागरिकांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानावरून अर्ज घेऊन त्यांच्याकडेच २९ मेपर्यंत अर्ज आधार क्रमांकाची नोंद करुन जमा करावेत. केशरी कार्डधारकांना ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ देण्याबाबतची कार्यवाही यापूर्वी केलेली असून त्यांना मोफत तांदूळ योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच शासकीय कर्मचारी, नोकरदार वर्ग, शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी मोफत धान्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विस्थापित मजुरांच्या मदतीसाठी आत्मनिर्भर सहाय्यक पॅकेज अंतर्गत धान्य दिले जाईल. जे विस्थापित मजूर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचे लाभार्थी नाहीत त्यांना मे व जून या दोन महिन्यांसाठी पाच किलो मोफत तांदूळ या योजनेअंतर्गत उपलब्ध होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा, तहसीलदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या याद्या तसेच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनी मदत केलेल्या लाभार्थ्यांची यादी व स्वस्त धान्य दुकानदारांच्या मदतीने विना शिधा पत्रिका धारकांची केलेली यादी विचारात घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. याशिवाय पोलिस, कामगार, उद्योग विभागांची मदत घ्यावी, असेही सूचीत केले आहे.या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ९२ स्वस्त धान्य दुकानदारांची मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक झाली़ जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार किशोर कदम (धुळे ग्रामीण), अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर), पुरवठा निरीक्षक अधिकारी छोटू चौधरी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सचिव संतोष जैन, उपाध्यक्ष मुरलीधर नागमोती व राजेश ओहळ, कोशागार शाखेचे यशवंत भदाने आदी उपस्थित होते.या बैठकीत प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे (विना शिधापत्रिकाधारक फॉर्म ) कोरे नमुने देण्यात आले. हा अर्ज वैयक्तिक लाभार्थ्यांनी घेऊन व त्यात आधार क्रमांक टाकून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे जमा करावयाचा आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना माहीत असलेल्या विना शिधापत्रिकाधारक मजुरांची यादी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे द्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या़स्वस्त धान्य दुकाननिहाय शासकीय कर्मचारी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येतील. केंद्रप्रमुख व महसूल कर्मचारी स्वस्त धान्य दुकानांच्या मदतीने विना शिधापत्रिकाधारकांची यादी तयार करण्याचे काम करतील. २९ मे पर्यंत ही यादी तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे बिगर शिधापत्रिकाधारकांनी २९ पावेतो अर्ज सादर करावेत.या बैठकीत दुकानदारांनी विमा कवच, कमिशनबाबत चर्चा केली. तसेच ग्राहक अरेरावी करीत असल्याने पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.चुकीची माहिती देणाºयांवर कारवाईचुकीची माहिती देऊन मोफत धान्य घेणाºयांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची असलेली शिधापत्रिका सुद्धा तत्काळ रद्द करण्यात येईल. कोणीही ही एकापेक्षा जास्त वेळा धान्य घेऊ नये म्हणून लाभार्थ्यांच्या रहिवासी क्षेत्राच्या बाहेर संबंधित लाभार्थ्यांना धान्य घेता येणार नाही, अशी उपाययोजना करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे