जवाहर फाऊंडेशन येथे मोफत काचबिंदू तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:37 IST2021-03-17T04:37:00+5:302021-03-17T04:37:00+5:30
वयाच्या चाळीसीनंतर अनेक रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण वाढलेले दिसते़ त्याचे योग्य असे निदान झाल्यास रुग्णांवर यशस्वी उपचार होऊ शकतात़ या ...

जवाहर फाऊंडेशन येथे मोफत काचबिंदू तपासणी
वयाच्या चाळीसीनंतर अनेक रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण वाढलेले दिसते़ त्याचे योग्य असे निदान झाल्यास रुग्णांवर यशस्वी उपचार होऊ शकतात़ या शिबिरात ४० रुग्णांची मोफत काचबिंदू तपासणी करण्यात आली़ काचबिंदू तपासणीसाठी आवश्यक असणारी विविध प्रकारची उपकरणे नेत्ररोग विभागात उपलब्ध आहेत़ त्यामुळे गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्ररोग विभागातर्फे करण्यात आले़
या काचबिंदू शिबिरास जवाहर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ़ भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ़ ममता पाटील, सहसचिव संगिता पाटील, अधिष्ठाता डॉ़ विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले़
शिबिराच्या यशस्वीतेसाठी नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ़ सुरेंद्र वडगावकर, प्रा़ डॉ़ योगेश तांबोळी, डॉ़ रिध्दी शेठीया, डॉ़ विशाल चंदनखेडे, डॉ़ आशिष उंद्रे आदींनी परिश्रम घेतले़