महावीर जयंतीनिमित्त होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:29+5:302021-04-27T04:36:29+5:30
नेर : धुळे येथील देवपूर परिसरातील अराध्य मेडिकल, नवकार मल्टीस्पेशालिटी होमिओ क्लिनिक आणि श्री साईकिसन पॉलिक्लिनिक अँड अलाईड हेल्थ ...

महावीर जयंतीनिमित्त होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप
नेर : धुळे येथील देवपूर परिसरातील अराध्य मेडिकल, नवकार मल्टीस्पेशालिटी होमिओ क्लिनिक आणि श्री साईकिसन पॉलिक्लिनिक अँड अलाईड हेल्थ इन्स्टिट्यूट संलग्न आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. दीपक जैन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोरोनाबाबतच्या शासकीय नियमांचे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वैयक्तिक प्रबोधनही करण्यात आले.
कोरोनामुळे धुळे जिल्ह्यातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्व पॅथीचे डॉक्टर आपापल्या परीने जनसेवा करीत आहेत. स्वतःच्या जीवावर उदार होऊन रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अनेक डॉक्टर्स दिवसरात्र झटत आहेत. धुळे येथील फुलवाला चौक परिसरातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. दीपक जैन यांनी कोविड योद्धा स्वरूपात चोख भूमिका बजावलेली आहे. कोरोना आजारामुळे पीडित रुग्णांना तब्बल वर्षभरापासून ते मार्गदर्शन करीत आहेत. महावीर जयंतीनिमित्ताने आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यासाठी डॉ. दीपक जैन यांनी बहुमूल्य पुढाकार घेतलेला आहे.
फॅमिली फिजिशीयन डॉ. सुनील सोनार, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे खान्देश विभागीय उपाध्यक्ष डॉ. गणेश जयस्वाल, आराध्य मेडिकलचे संचालक जितेंद्र पाटील, स्वप्नील चौधरी, अक्षय पाटील, गोविंद पाटील, पौर्णिमा पाटील, स्वाती भोसले आदिनीं होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यासाठी योगदान दिले.