न्यायालयाचा आदेश डावलून बँक खाते वापरणाऱ्या विश्वस्तावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:11+5:302021-09-07T04:43:11+5:30
साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळाचे पिंपळनेर येथील भारतीय स्टेट बँक खाते असून विश्वस्त मंगलदास नंदलाल भवरे (रा. माळगाव, पो. ...

न्यायालयाचा आदेश डावलून बँक खाते वापरणाऱ्या विश्वस्तावर फसवणुकीचा गुन्हा
साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळाचे पिंपळनेर येथील भारतीय स्टेट बँक खाते असून विश्वस्त मंगलदास नंदलाल भवरे (रा. माळगाव, पो. वार्सा ता. साक्री) यांना न्यायालयाने हे खाते वापरण्यास मनाई केली होती. तरीदेखील ५ मे २०१८ रोजी मंगलदास भवरे यांनी ४ धनादेशाद्वारे प्रत्येकी ८ लाख ४४ हजार ८८९, ९ लाख, पुन्हा ९ लाख आणि ३९ हजार असे एकूण २६ लाख ८३ हजार ८८९ रुपये हे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पिंपळनेर या खात्यावर वर्ग करुन घेतली. याप्रकरणी साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळ पिंपळनेरचे विश्वस्त त्र्यंबक महारु सोनवणे यांनी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने आदेश दिल्याने पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी महारु सोनवणे यांची फिर्याद नोंदवून घेत मंगलदास भवरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे घटनेचा तपास करीत आहेत.