धुळ्यातील चार विद्यार्थ्यांनी एमपीएससीत मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:54 IST2020-03-19T12:54:01+5:302020-03-19T12:54:24+5:30
दोन मुलींचा समावेश : पोलिस उप निरीक्षकपदी होणार नेमणूकलोकमत न्यूज नेटवर्क

dhule
धुळे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत धुळ्यातील चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ त्यात दोन मुलींचा समावेश आहे़ सपना देवरे, धनश्री सोनवणे, सचिन चौधरी आणि शैलेश चौधरी अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत़ त्यांची पोलिस उप निरीक्षकपदी नेमणूक होणार आहे़
सपना देवरे ही एक वर्षाची असतानाच वडीलांचे छत्र हरपले़ आई आणि काकांनी काबाडकष्ट करुन शिकवले़ अनेकदा यशाने हुलकावणी दिली पण तिने जिद्द सोडली नाही़ अखेर तिने यशाला गवसणी घातली़ सचिन चौधरी हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला आहे़ त्याची आणि शैलेश चौधरी याची खेळाडूंसाठी राखवी असणाऱ्या जागांवर निवड झाली आहे़ सपना आणि धनश्री प्रतिक्षा यादीतील उत्तीर्ण विद्यार्थीनी आहेत़ यशस्वी विद्याथी, विद्यार्थीनींचे सर्वत्र कौतुक होत आहे़ येथील युनिक अॅकॅडमीतून मिळालेल्या मार्गदर्शनाला त्यांनी मेहनतीची जोड देवून एमपीएससी परिक्षेत बाजी मारली़