चार रूग्णांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:08 IST2020-05-04T17:03:54+5:302020-05-04T17:08:27+5:30

शिंदखेड्याच्या ७० वर्षीय महिलेचा समावेश,१४ दिवसानंतर चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

Four patients lost corona | चार रूग्णांनी कोरोनाला हरविले

dhule

धुळे- हिरे रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत आसलेल्या चार रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाशी लढाई जिंकलेल्या रूग्णांमध्ये शिंदखेडा येथील ७० वर्षीय महिला व धुळे शहरातील तीन रूग्णांचा समावेश आहे. या चारही रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. १४ दिवसानंतर त्यांचे स्वॕब घेण्यात आले होते. त्याचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

Web Title: Four patients lost corona

टॅग्स :Dhuleधुळे