सोमवारी आढळले सहा रूग्ण, शिरपूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:29 IST2020-05-25T18:03:51+5:302020-05-25T21:29:32+5:30

कोरोनाबाधितांची संख्या झाली ११५

Four more reports in Dhule are positive | सोमवारी आढळले सहा रूग्ण, शिरपूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू 

dhule

धुळे - जिल्हाभरात सोमवारी कोरोनाचे सहा नवीन रूग्ण आढळून आले. शिरपूर येथील तीन, धुळे शहरातील दोन तर साक्री तालुक्यातील धमनार येथील एका रूग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. 
 तीन कोरोना पॉजीटीव्ह रूग्णांचा मृत्यू - सोमवारी शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय पुरूष, शिरपूर येथील काझीनगर परिसरातील ६७ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तर २३ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या शिरपूर येथील महिलेचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Four more reports in Dhule are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे