शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत सरपंच, उपसरपंचासह चार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 12:29 IST

संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको : साक्री तालुक्यातील घटना 

ठळक मुद्देदातर्तीचे सरपंच, उपसरपंच यांचा मृतांमध्ये समावेश आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी साक्री येथे महामार्गावर रास्तारोको सुरू  दुस-या अपघातातील दोघे अनोळखी, ओळख पटविण्याचे प्रयत्न 

लोकमत आॅनलाईनसाक्री : तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण चार जण ठार झाले. त्यात तालुक्यातील दातर्ती ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंचांचा समावेश आहे. दरम्यान या अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी सकाळपासून येथील राष्टÑीय महामार्गावर रास्तारोको सुरू केले असून वाहतूक ठप्प झाली आहे. दुस-या अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही. तालुक्यातील दातर्ती गावाचे सरपंच सदाशिव बागुल (३०) व उपसरपंच गणेश सूर्यवंशी हे दोघे दुचाकीने जात असताना त्यांना वाळू माफियांच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेवाळी -दातर्ती दरम्यान घडली. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. आरोपींवर कारवाईसाठी रास्तारोको दरम्यान हे वृत्त तालुक्यात पोहचताच संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी या अपघातास जबाबदार असलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई  करावी या मागणीसाठी शहरात राष्टÑीय महामार्गावर रविवारी सकाळी ९ वाजेपासून रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. त्यात तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचा सहभाग आहे. रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूला आठ-नऊ किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. पोलिसांचा फौजफाटाही आंदोलन स्थळी आहे. मात्र ग्रामस्थांनी रास्तारोको सुरूच ठेवला आहे. दुस-या अपघातातही दोन ठार तालुक्यातील महामार्गावरील देवनगर गावाजवळ ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून शनिवारी मध्यरात्री झालेल्या दुस-या एका अपघातात दोन जण ठार झाले असून ते अनोळखी आहेत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान एकाच रात्री दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात