पाचकंदील परिसरात चार तास कारवाई मात्र चार मिनिटांत परिस्थिती पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:33 IST2019-11-16T22:32:27+5:302019-11-16T22:33:05+5:30
महापालिका । नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य; अधिकारी व व्यावसायिकांमध्ये वाद, धक्काबुक्की

Dhule
धुळे : शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते़ मनपा व वाहतूक शाखेने साहित्य जप्त करून कठोर कारवाई करावी अन्यथा गय केली जाणार नसल्याचा दम आमदार डॉ़ फारूख शाह यांनी शुक्रवारी भरल्याने शनिवारी आग्रारोडवरील पाचकंदील परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र अवघ्या चार मिनिटांत पुन्हा स्थिती जैसे थे झाली़
महापालिका अतिक्रमन निमूर्लन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता मालेगावरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते महात्मा गांधी पोलीस चौकीपर्यत अतिक्रमण काढण्यात आले होते़ कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेकडून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होतो़ यावेळी प्रभाकर चित्रपटगृह समोरील रस्त्यावर व्यवसाय करणाºया हॉटेलचा गॅससिलिंडर तर शेगडी जप्त करण्यासाठी गेलेल्या मनपाचे कर्मचारी व दुकान मालकाचा वाद झाला़ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने वादावर पडदा पडला़ मनपाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल, फेरीवाले, दुकानदार, चहाच्या टपºया, गॅरेजेस, सायकलीचे पंक्चर दुकाने यांचे साहित्य जप्त केली.
हातगाड्या लपविल्या
मनपाकडून आग्रारोडवर कारवाई केली जात असल्याची महिती फेरीवाल्यांनी दुपारी १२ वाजेपर्यत मिळाली़ तत्पूर्वी फळविक्रेत व भाजी विक्रेत्यांनी हातगाड्या पाचकंदील चौकातील लहान गल्ल्यांमध्ये लपविल्या होत्या़ त्यानंतर पाचकंदील चौकातून पथक पुढे गेल्यानंतर पुन्हा या चौकातील पूर्वस्थिती पूर्वपदावर आली़
ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव, राजेंद्र कदम, अकील शेख, भुषण जगदाळे, प्रविण पाटोळे, युवराज खरात, दीपक पगारे आदींनी केली़