धुळे - जिल्हाभरात शनिवारी रात्री वादळ वा-यासह झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने तालुक्यातील वरखेडी गावाच्या शिवारातील एका शेतात पत्र्याचे शेडवर चिंचेचे झाड कोसळले. यात शेडमध्ये झोपलेले पावरा कुटुंबीय दाबले गेल्याने चार जण ठार एक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये महिलेसह तीन बालकांचा समावेश आहे. तालुक्यातील वरखेडी गावाच्या शिवारात प्रभाकर दादू गुजर यांच्या शेतात दादूराम जामा पावरा (32)रा.सापखडकी ता.पानसमेल जि.बडवाणी मध्यप्रदेश हे सालदार असून ते शेतातील पत्र्याचे शेडमध्ये कुटुंबीयांसह राहतात. काल (दि.2) रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक वादळ वा-यासह झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने पत्र्याचे शेड जवळील चिंचेचे झाड शेडवर कोसळले. यात शेडमध्ये झोपलेले दादूराम पावरा जखमी झाले तर त्यांची पत्नी अनिताबाई (28), मुलगा वशिला (03), मुलगी पिंकी(02),रोशनी(01) असे चौघेजण दाबले गेल्याने जागीच ठार झाले. चौघांना मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले असून जखमी दादूराम पावरा यांचेवर उपचार सूरु आहेत. याबाबत पोलिस हेडकाॅन्स्टेबल जे.एस ईशी यांनी तालुका पोलिसांना माहिती कळविली आहे.
धुळे जिल्ह्यात पत्र्याच्या शेडवर झाड पडल्याने चार जण ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 10:23 IST