शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पूजा बागुल हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सैन्यदलातील पतीनेच दिली होती पत्नीला संपवण्याची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:33 IST

धुळ्याच्या पूजा बागुल हत्या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Pooja Bagul Case: धुळ्यातील पूजा बागूल खूनप्रकरणी पोलिसांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ३० मे रोजी पूजा बागुल या विवाहितेचा सैन्य दलात कर्मचारी असलेल्या पतीने विषारी इंजेक्शन देऊन खून केला होता. पतीसह कुटुंबीयांनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबियांनी केला होता. पूजाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एका विधिसंघर्षित मुलासह चारजणांना अटक केली आहे. मयत पूजा बागुलला मारण्यासाठी पती कपिल बागुलने धुळ्यातील चारजणांना सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.

धुळे येथील देवपुरातील वलवाडीत २९ मे रोजी शारदा ऊर्फ पूजा बागुल हिचा खून झाला होता. अवघ्या काही तासांतच पश्चिम देवपूर पोलिसांनी तिचा पती कपिल बागुल, त्याचे वडील बाळू बागुल, आई विजया बागुल, बहीण रंजना धनेश माळी तसेच प्रेयसी प्रज्ञा कर्डिले यांना अटक केली होती. त्यानंतर कपिल यानेच पत्नीला पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिल्याचे पोलिसांसमक्ष कबूल केले होते. मात्र, या हत्याकांडात भूषण बापू काळे (२०), यश ऊर्फ जयेश अनिल जगताप (१९), सचिन ऊर्फ बब्या दौलत जाधव (३५) आणि दोन विधिसंघर्षित मुलांनी मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या नऊवर पोहोचली आहे.

पूजा बागुलची हत्या करण्यासाठी या चौघांना पाच लाखांची सुपारी देण्यात आल्याचे कपिलने कबूल केले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी पहाटे संशयितांना ताब्यात घेतले. चौघांनी पूजा बागुलच्या हत्येची कबुली दिली. कपिल बागुलचे प्रज्ञा कर्डीले हिच्याशी असलेल्या अनैतिक संबंधांना पुजाने विरोध केला होता. त्यामुळे त्याने पूजाच्या हत्येचा कट रचला होता. कपिल बागुल हा प्रेयसीला तिच्या मुलांसह घरी आणायचा. या सगळ्या प्रकाराला विरोध केल्यानंतर कपिल पूजाला अजून चार विवाह करेल, अशी धमकी देत होता.

प्रज्ञाने जादूटोणा करुन पूजाला संपवण्याची योजना कपिलला सांगितली होती. मात्र दोन वेळा प्रयत्न करुन काही न झाल्याने कपिल आणि प्रज्ञाने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाला पैसे मागण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मांत्रिकाने आम्ही पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन पूजाला मारु असं सांगितले. त्यानुसार त्यांनी पूजाच्याच घरात तिला इंजेक्शन दिले आणि तिला मारहाण केली. मात्र तिचा मृत्यू न झाल्याने सर्वजण तिथेच वाट पाहत होते. शेवटी पूजाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याचे नाटक केले. मात्र मारहाणीच्या खुणांमुळे पूजाच्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस