वर्षअखेर आढळले २७६ एड्सबाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:39 IST2019-12-01T12:36:22+5:302019-12-01T12:39:04+5:30
एचआयव्हीतून सावरतोय जिल्हा । १९ वर्षात १२ हजांर एड्सबाधितांवर उपचार; रूग्णांवर एआरटी केंद्रातून समुपदेश व उपचार

Dhule
चंद्रकांत सोनार ।
धुळे : एक जीवघेना रोग असलेला एड्स रूग्णांची संख्या १३ वर्षापूर्वी जिल्हात चिंताजनक होती़ शासनाने एड्स नियंत्रणासाठी गांभीर्याने लक्ष दिल्याने आता एड्स आजारापासून आपला जिल्हा सावरला आहे़ १९ वर्षाच्या आकडेवारीनुसार यंदा आॅक्टोंबरअखेर २७४ एड्स रुग्ण आढळून आले आहे़
देशात एचआयव्ही एड्स संसर्गित लोक साधारणपणे २५ लाखांपेक्षा अधिक आहे. देशात दर शंभर एचआयव्ही संसर्गित रुग्णांमध्ये ६१ पुरूष आणि ३९ महिला असतात. या आकडेवारीनुसार एडस बाधितांमध्ये पुरूषांची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट होते. येथील आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १९ वर्षात २००० मध्ये बाधितांची टक्केवारी १३.१७ होती़ त्यानंतर बाधितांचे प्रमाण वाढून २००७ मध्ये ३१.६४ पर्यत पोहचले होते़ आरोग्य विभागाकडून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम यावेळी राबविण्यात आली़ त्याचा परिणाम २०१० मध्ये १४.८५ टक्यावरुन २०१८ मध्ये बाधितांची संख्या २.४६ टक्केपर्यंत आटोक्यात आली. तर २०१९ जुनपर्यत एड्स बाधितांचा आकडा १.६८ पर्यत आणण्यात आला आहे़
यंदाची आकडेवारी
शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविदयालयात एड्सबाधितावर समुपदेशन, तपासणी व उपचार केले जातात़ २००६ ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीत १० हजार १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात ४ हजार ४९६ रुग्ण एड्सबाधित आढळले़ त्यात २१३ बालकांचा समावेश होता़
५५ हजार ८०९ रुग्ण तपासणी
यावर्षी आॅक्टोबरअखेर ५५ हजार ८०९ रुग्णांची तपासणी झाली होती़ त्यात २७४ रुग्ण बाधित आढळून आले आहे़ त्यात १३१ गरोधर मातांना समावेश आहे़ रुग्णांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालय, शिरपूर शासकीय रुग्णालय तसेच ११ आरोग्य केंद्रातून रुग्णांवर मोफत उपचार केले जातात़
जिल्ह्यात एड्स नियंत्रणासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ नागसेन रामराजे यांच्या मार्गदर्शनात एआरटी केंद्राच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ़शिल्पा राव, डॉ़ शिल्पा पवार, डॉ़ जे़पी़ पाटील यांच्यासह पर्यवेक्षक, प्रयोग शाळा तंज्ञ असे १३ कर्मचारी परिश्रम घेत आहेत़
३५ गावामध्ये सर्वाधिक बाधित
1 गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या धुळे जिल्ह्यात ३५ गावांमध्ये एड्स बाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक आढळून येते़ स्थालांतर व विवाहबाह्य संबधांत सुरक्षा न घेतल्याने महिलांसह पुरूषांमध्ये एड्स आढळून येतो़
दरवर्षी ११०० रूग्णांची तपासणी
2 जिल्हा रूग्णालयासह शिरपूर ग्रामीण रुग्णालय अशा दोन केंद्रात एड्स बाधित रुग्णांवर मोफत उपचार केला जातो़ दरवर्षी ११ हजार रूग्णांची तपासणी हिरे महाविद्यालयातून करून त्यात निष्पन्न झालेल्या रूग्णांवर उपचार केले जात आहे़
दीड लाख रूग्णांची तपासणी
3 भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात सन २००० पासून एड्स बाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे़ त्यात आतापर्यत १९ वर्षात १ लाख २२ हजार ४२८ पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे़
राज्यभरातील रूग्णावर उपचार
4 जिल्ह्यासह मालेगाव, झोडगे, चाळीसगाव, भडगाव, कन्नड, नंदूरबार जळगाव अशा जिल्हयातील रूग्ण उपचार घेत आहे़ तर शिरपूर येथे मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील रूग्ण उपचार घेतात़