माजी आमदार शरद पाटील यांचा समर्थकांसह काॅंग्रेस प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:37+5:302021-06-04T04:27:37+5:30
धुळे : धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या ...

माजी आमदार शरद पाटील यांचा समर्थकांसह काॅंग्रेस प्रवेश
धुळे : धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील उपस्थित होते.
धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील यांनीही माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील यांच्याशी विचारविनिमय करून पुन्हा काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. युवक बिरादरी चळवळीतून काँग्रेस पक्षात सक्रिय झालेल्या प्रा. पाटील यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. ते आता पुन्हा स्वगृही परतले आहेत.
मुंबईत गुरुवारी दुपारी तीन गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात माजी आ. शरद पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअध्यक्ष व्ही. यु. पाटील, धुळे पं. स. चे माजी सभापती कैलास पाटील, प्रा. जसपालसिंह सिसोदिया, सुरेश बैसाणे, आनंद जावडेकर, इलियास अन्सारी, कमलेश भामरे, भाजपचेे गोंदूर सरपंच राजेंद्र पाटील, उत्तमराव देसले, रमेश अहिरराव, किशोर पाटील, नितीन अहिरराव, युवराज पाटील, दिनेश पाटील-महिंदळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी काँग्रेस पक्षातर्फे स्वागत करताना महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि त्यांच्यासह असंख्य अनुभवी कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद निश्चितच वाढणार आहे. म्हणून आज खरंच आनंदाचा दिवस आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवून जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता स्थापन केल्याशिवाय राहणार नाही. अपात्र ठरलेल्या धुळे जिल्हा परिषदेच्या १५ जागांपैकी १२ जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून आणू आणि जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करू, असा विश्वास आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हयातील अनुभवी नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा उपयोग पक्षवाढीसाठी निश्चित होईल आणि पुन्हा एकदा धुळे जिल्हा व उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला उभा राहील, अशी खात्री प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, काँग्रेसचे हुसैन दलवाई, नसिम खान, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर, काँग्रेस धुळे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, नाशिक काँग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष लहू पाटील, पं. स. गटनेते पंढरीनाथ पाटील, कृऊबा प्रशासक रितेश पाटील, धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, विशाल सैंदाणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, एन. डी. पाटील, अरुण पाटील, संतोष राजपूत, विशाल पाटील, बापू खैरनार, रावसाहेब पाटील, कृष्णा पाटील, संभाजी गवळी, भाऊसाहेब पाटील, नंदू धनगर, झुलाल पाटील, दिनेश माळी, सागर पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.