माजी सरकारी वकील सुनील जैन यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:44 IST2019-11-22T22:43:16+5:302019-11-22T22:44:04+5:30
हृदयविकाराचा झटका : आज अंत्ययात्रा

माजी सरकारी वकील सुनील जैन यांचे निधन
धुळे : येथील कौटुंबिक न्यायालयात कामकाज सुरू असताना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक अॅड़ सुनील जैन यांना हृदयविकाराचा झटका आला़ घटना लक्षात येताच त्यांना दवाखान्यात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली़
अॅड़ जैन यांनी धुळे बार असोसिएशनमध्ये उत्कृष्ट काम करून आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे़ जिल्हा सरकारी वकील म्हणूनही त्यांनी काम सांभाळले होते़ याशिवाय धुळे वकील संघाचे ते माजी सचिव होते़ शिवसेना, संघ परिवाराशी ते निगडित होते़ त्यांनी अनेक मोठमोठी प्रकरणे हाताळून त्यांनी गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहचविले होते़ त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वाजता संभाप्पा कॉलनीतील राहत्या घरापासून निघेल़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे़