..तर मुख्यमंत्र्यांची धुळ्य़ातील सभा उधळून लावू

By Admin | Updated: May 15, 2017 13:26 IST2017-05-15T13:26:38+5:302017-05-15T13:26:38+5:30

इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला़

..follow the meetings of chief ministers' rally meetings | ..तर मुख्यमंत्र्यांची धुळ्य़ातील सभा उधळून लावू

..तर मुख्यमंत्र्यांची धुळ्य़ातील सभा उधळून लावू

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 15 - थोर पुरुषांच्या प्रतिमेला पायदळी तुडविणा:याला मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यासपीठावर बसविल्यास सभा उधळून लावली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी सोमवारी  पत्रकार परिषदेत दिला़ दरम्यान, ती व्यक्ती कोण, अशी विचारणश केली असता याबाबत त्यांनी नाव सांगण्यास असमर्थता दर्शविली़
धुळे शहरात विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार 17 रोजी जिल्ह्याच्या दौ:यावर येत आह़े शिंदखेडय़ातील कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात त्यांची सभा आयोजित केली आह़े या अनुषंगाने मोरे यांनी सभेच्या पाश्र्वभूमीवर इशारा दिला आह़े थोर पुरुषांच्या प्रतिमेला पायदळी तुडविणा:या त्या व्यक्तीला व्यासपीठावर स्थान देवू नय़े, त्या व्यक्तीची माहिती आमदार गोटे यांनी प्रशासनाला द्यावी व गुन्हा दाखल करावा़,  तसे केले नाही तर  मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला़
पांझरा नदीत होणा:या विकास कामांची परवानगी विविध विभागांकडून मिळालेली नसताना उद्घाटन कोणत्या आधारावर होत आह़े, होणारे हे काम बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्र्यांनीही या बाबतीत माहिती जाणून घ्यावी, असेही मोरे यांनी यावेळी सांगितल़े

Web Title: ..follow the meetings of chief ministers' rally meetings