गावठी कट्टाच्या रूपाने फोफावतेय गुन्हेगारी प्रवृत्ती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:21+5:302021-07-14T04:41:21+5:30
धुळे : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि पिस्तूलसारखे घातक शस्त्र बाळगणाऱ्यांच्या प्रमाणात झालेली वाढ होण्यास सुरुवात झाली आहे़ ...

गावठी कट्टाच्या रूपाने फोफावतेय गुन्हेगारी प्रवृत्ती !
धुळे : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि पिस्तूलसारखे घातक शस्त्र बाळगणाऱ्यांच्या प्रमाणात झालेली वाढ होण्यास सुरुवात झाली आहे़ आठवड्याभरात गावठी कट्टे पकडल्याचे गुन्हे दाखल झाल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती पुन्हा फोफावते की काय? अशी चिन्हे आता प्रकर्षाने दिसू लागली आहे. संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून केला जात आहे. यात धुळे जिल्हा पोलीस दलाने सहभाग नोंदविला आहे.
शस्त्रधारकांविरुध्द कारवाई
१ ते १५ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात अग्निशस्त्र शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलाकडून शस्त्र शोधमोहीम राबविली जात आहे. धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पोलिसांनी स्वत: कारवाई करून गुन्हेगारांची प्रवृत्ती ठेचली आहे. विशेष मोहिमेत गावठी कट्टे, पिस्तूलसह जिवंत काडतूस असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे.
अधिकाऱ्यांचा समावेश
या मोहिमेत जिल्ह्यांमधील पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली होती. त्यांच्याद्वारे अवैध शस्त्रांविरुद्धच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शहरासह जिल्ह्यात ज्या काही घटना घडल्या होत्या त्यातदेखील आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आलेल्या आहेत.
कोम्बिंग ऑपरेशनचा फायदा
जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवेगळ्या टप्प्यात कोम्बिंग आॅपरेशन राबविले असल्याचे दिसून येत आहे़ त्यातून शस्त्र हस्तगत करण्यात सुरुवात झाली आहे़ त्यात संशयितांना जेरबंदही केले जात आहे़ अचानक राबविलेली ही मोहीम कौतुकास पात्र ठरत आहे़ धुळे पोलीस ‘अॅक्टिव्ह’ झाले असल्याचे दिसून येत आहे़ एका पाठोपाठ गावठी कट्टा, रिव्हॉलव्हर, हस्तगत करण्यात सुरुवात झालेली आहे़ शस्त्र यांच्याकडे येतातच कुठून? आले तर ते जातात कुठे? याचा व्यवहार होतो कसा? याचा सर्वंकष शोध घेण्याची आवश्यकता आहे़ या कारवाईमुळे गुंडांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत़
संवादातून बºयाच बाबींची उकल
गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आधुनिक प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे़ गावठी कट्यासह अवैध धंदे, दारु निर्मिती व विक्री, गुन्हेगारी यावर आवर घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांशी सन्मवय रहावा यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यावर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा सर्वाधिक भर आहे़ संवादातून बºयाच बाबींचा निपटारा होत असल्याचा विश्वास त्यांना आहे़ त्यातून गावठी कट्यांसारखे गुन्हे समोर येऊ लागले आहेत़ संवादाचाच हा परिणाम असल्याचे समोर येत आहे़
आठवड्यात अशी झाली कारवाई
धुळे तालुक्यातील आर्वी येथून लगातर दोन कारवाई करुन दोघांकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आले़ बाजार समितीच्या आवारात संशयास्पद दोघांना पकडून त्यांच्याकडून गावठी कट्टा पकडण्यात आला़ कबीरगंज भागात मोबाईलवर गावठी कट्यासोबत फोटो काढून व्हायरल करणाºयाच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ ट्रकवरुन येत गुरुद्वाराजवळ कट्याची विक्री होण्यापुर्वीच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले़ या सर्व कारवाई आठवड्यातच झालेल्या आहेत़
(कोट)
गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी पोलीस दलाकडून सर्वाेतोपरी प्रयत्न केले जात आहे़ अवैध शस्त्र बाळगणाºयांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले जात आहे़ कोणाला गावठी कट्याविषयी काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा़
- शिवाजी बुधवंत,
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा