‌उड्डाणपूल बनला वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:15+5:302021-04-01T04:36:15+5:30

गुरुद्वाराजवळील उड्डाणपुलाचा बोगदा खाली मोठमोठी वाहने पार्किंग केले जातात. त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनधारकांना बोगदा पास करताना त्रास सहन ...

The flyover became a parking lot | ‌उड्डाणपूल बनला वाहनतळ

‌उड्डाणपूल बनला वाहनतळ

गुरुद्वाराजवळील उड्डाणपुलाचा बोगदा खाली मोठमोठी वाहने पार्किंग केले जातात. त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनधारकांना बोगदा पास करताना त्रास सहन करावा लागतो. या बोगद्याजवळ दोन मंगल कार्यालय आहेत. शेजारी आरटीओ ऑफिस आहे, तसेच या ठिकाणी लहान मोठ्या गॅरेज असल्यामुळे व वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे लग्नकार्यासाठी आरटीओ ऑफिसातील कामासाठी गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीसाठी आलेले वाहन या बोगदा खालीच पार्किंग केले जाते. मंगल कार्यालयात लग्नाच्या दिवशी तर चारचाकी वाहनाची या बोगदा खाली खूपच गर्दी असते. बोगद्यामधून वाहन काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या बोगद्याखाली एक पीयूसी सेंटर ही उघडण्यात आले आहे. मोटारसायकली अडवून पीयूसी काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे तेथे गर्दी होताना दिसून येत आहे. मात्र, या ठिकाणी पोलिसांकडून पार्किंग केलेल्या वाहनधारकावर व अतिक्रमण केलेल्या नागरिकावर व वाहन पार्किंग करणाऱ्या वर कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: The flyover became a parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.