शिरपूर : तालुक्यात गेल्या २ दिवसापासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर टळले आहे़ शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अरूणावती नदीला पूर आला आहे़ दरम्यान, सांगवी मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे़शिरपूर तालुक्यात मान्सूनपूर्व व मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली़ ४ जून रोजी शिरपूर मंडळात ६३ मिमि, थाळनेर ५६, होळनांथे ५२, अर्थे ४२, जवखेडा २९, बोराडी ६९, सांगवी मंडळात १६ मिमि पाऊस झाला आहे़ मात्र त्यानंतर आठवडाभराची विश्रांतीनंतर १३ रोजी काही भागात पाऊस झाला़ १७ रोजी देखील ४२ मिमि पाऊस शिरपूर मंडळात झाला़ मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारली़जूनच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली़ तालुक्यात सर्वत्र सारख्या प्रमाणात पाऊस झाला नसला तरी परिसरात झालेल्या पावसामुळे जमिनीत बºयापैकी ओलावा निर्माण झाला़ हवामान खात्याने मान्सून दाखल झाल्याचे संकेत दिल्याने आता चांगल्या पावसाला सुरूवात होईल या आशेने जूनच्या तिसºया आठवड्यात ७६ टक्के शेतकºयांनी पेरणी केली़ मात्र आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती़ कधी ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याचे ऊन पडत असल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे़ कडाक्याच्या उन्हामुळे जमिनीच्यावर आलेल्या पिकांनीही माना टाकल्या आहे़ कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे़ ज्या शेतकºयांकडे ओलिताची साधने आहेत त्यांची पिके जगवण्यासाठी धडपड सुरू होती़ पीक उगवण्याच्या स्थितीत असतांना पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता़ मात्र, २६ रोजी रात्री ११ वाजेनंतर पावसाने हजेरी लावली़ शहरासह तालुक्याच्या संपूर्ण भागात रिमझिम पाऊस झाला़ अर्थे व जखखेडा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली़ त्यामुळे पाऊस झाल्याच्या दुसºयाच दिवशी उर्वरीत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली़२७ रोजी रात्री १० वाजेनंतर देखील पावसाने हजेरी लावली़ शनिवारी झालेला पाऊस तर कंसात आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस मंडळानिहाय पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात ३ (१२१ मिमि), थाळनेर २२ (१९०), होळनांथे २७ (१२५) , अर्थे १२ (१८७), जवखेडा ० (१२९), बोराडी ३२ (२२४), सांगवी ८४ (२५४) मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ गेल्या दोन दिवसापासून सांगवी मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़पूर पाहण्यासाठी झाली गर्दीमहाराष्ट्र-मध्यप्रदेश सरहद्दीवर तसेच सांगवी मंडळात जोरदार पाऊस झाल्यामुळे अरूणावती नदीला पूर आला़ त्यामुळे आमदार कार्यालयाजवळील केटी बंधारावरून पूराचे पाणी वाहत होते़ २८ रोजी सकाळीअरूणावती नदीला पूर आल्याचे कळताच अनेकांनी पूलावर गर्दी केली होती़
अरूणावतीला पूर,सांगवी मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 22:44 IST