बोरविहीरला पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:35+5:302021-02-05T08:44:35+5:30
शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ध्वजारोहण धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी प्राचार्या डाॅ.शोभा चौधरी यांच्या हस्ते ...

बोरविहीरला पोलीस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ध्वजारोहण
धुळे : धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी प्राचार्या डाॅ.शोभा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.पी.पी.छाजेड उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय संविधानाचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. यावेळी सर्वांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे आगामी परीक्षा
धुळे : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे राष्ट्रभाषा प्रबोध, प्रवीण, पंडितपर्यंतच्या परीक्षा २० व २१ मार्चला होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसावयाचे असेल. त्यांनी १५ फेब्रुवारीच्या आत परीक्षा शुल्कासह शिक्षा फाॅर्म भरावयाचे आहे. तसेच शासकीय सेवेमध्ये पदाेन्नतीच्या दृष्टीने ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना या परीक्षेत बसावयाचे असेल त्यांनीही संपर्क करावा. फाॅर्म भरण्यासाठी राष्ट्रभाषा भवन, न्यू सिटी हायस्कूल सायंकाळी ५ ते ७ यावेळेत संपर्क साधावा, असे केंद्र सचिव प्रा.जसपालसिंह सिसोदीया यांनी कळविले आहे.