निजामपूर येथे आझाद चौकात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:33+5:302021-08-17T04:41:33+5:30
अध्यक्षस्थानी निजामपूर सरपंच निलिमा भार्गव होत्या. कोरोना काळात जीव धोक्यात घालून ज्यांनी लोकांना सेवा दिल्या ते कोरोना वॉरियर्स डॉक्टर, ...

निजामपूर येथे आझाद चौकात ध्वजारोहण
अध्यक्षस्थानी निजामपूर सरपंच निलिमा भार्गव होत्या. कोरोना काळात जीव धोक्यात घालून ज्यांनी लोकांना सेवा दिल्या ते कोरोना वॉरियर्स डॉक्टर, आशा वर्कर्स, पोलीस कर्मचारी, स्वछता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सन्मान डॉ. किशोर वाणी यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रगीत, झेंडागीत आणि देशभक्तीपर गीत आदर्श विद्या मंदिरातील गीत मंचच्या विद्यार्थिनींनी म्हटले. ध्वजस्तंभाजवळ मंच उभारला होता. ध्वजस्तंभ फुलमाळांनी सुशोभित करण्यात आला होता. गणमान्य व्यक्तींना बसण्यासाठी खुर्च्या ठेवून आसनव्यवस्था करण्यात आली होती. झेंडा फडकला तेव्हा त्यावर वरून पुष्पवृष्टी करण्यात आली. अमृत महोत्सवानिमित्त उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. निजामपूर जैताणे शिंपी समाजबांधवांनी स्वछता कर्मचाऱ्यांना कपडे वाटप केले. उपसरपंच महेंद्र वाणी, मिलिंद भार्गव, परेश वाणी, गजानन शाह, ताहीर मिर्झा, ग्राम पालिका सदस्य, माजी सरपंच, शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक बधान यांनी व आभार प्रकाश बच्छाव यांनी मानले.
...