जैताणे ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:37 IST2021-01-19T04:37:11+5:302021-01-19T04:37:11+5:30
प्रत्यक्ष मतदानापूर्वी शहर विकास आघाडीने चार जागा बिनविरोध जिंकण्यात यश मिळविले होते. मतदानानंतर लढवत असलेल्या ७ जागांपैकी ६ जागा ...

जैताणे ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचा झेंडा
प्रत्यक्ष मतदानापूर्वी शहर विकास आघाडीने चार जागा बिनविरोध जिंकण्यात यश मिळविले होते. मतदानानंतर लढवत असलेल्या ७ जागांपैकी ६ जागा मिळवत एकूण १० सदस्य निवडून आणत आपल्या सत्ता स्थापनेचा दावा मजबूत केला़ वार्ड १ मधून गणेश न्याहळदे, शाम भलकारे, कविता मुजगे़ वार्ड २ मधून गोकुळ पगारे (बिनविरोध), अश्विनी बोरसे (बिनविरोध), रमनबाई न्याहळदे (चौधरी), वार्ड ५ मधून बाजीराव पगारे (बिनविरोध), सत्तार मणियार (बिनविरोध) वार्ड ६ मधून संगीता मोरे, हिम्मत मोरे अशा १० सदस्यांना निवडून आणण्यात पॅनेलप्रमुख व पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे यांना यश आले आहे. गोकुळ पाटील गटाच्या वार्ड ३ मधून राजेश बागुल (बिनविरोध), वार्ड ५ मधून अनिता जाधव (बिनविरोध) असे दोन सदस्य निवडून आले आहेत, तर माजी सरपंच संजय खैरनार व ईश्वर न्याहळदे यांच्या ग्रामविकास पॅनेलला वार्ड ४ मधून सायंकाबाई हरी सोनवणे (बिनविरोध), कविता राकेश शेवाळे व वार्ड ६ मधून माजी सरपंच ईश्वर न्याहळदे यांच्या आई जिजाबाई कृष्णा न्याहळदे अशा तीन जागी यश मिळाले आहे. अपक्ष म्हणून ग्रामसंग्रामच्या रिंगणात उतरलेले वार्ड ३ मधून तनुजा नंदकुमार जाधव व वार्ड ४ मधून अनुसूचित जाती प्रवगार्तून समाधान महाले यांनी विजय मिळविला आहे.
परिवर्तनसोबतच प्रस्थपितांच्या ऐवजी युवकांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणे हा या निवडणुकीत मुख्य मुद्दा ठरला असल्याचे बोलले जात आहे. माजी सरपंच संजय खैरनार यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग न नोंदविणे याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी सरपंच ईश्वर न्याहळदे यांनी अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत मारलेली बाजी हेदेखील या निवडणुकीत लक्षवेधी ठरले.