वाडी येथील पाच व्यावसायिकांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:07+5:302021-03-31T04:36:07+5:30

बोराडी, ता. शिरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंग नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाडी येथील पाच व्यावसायिकांना ...

Five traders in Wadi fined Rs 5,000 | वाडी येथील पाच व्यावसायिकांना पाच हजारांचा दंड

वाडी येथील पाच व्यावसायिकांना पाच हजारांचा दंड

बोराडी, ता. शिरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंग नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाडी येथील पाच व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड ठोठवण्यात आला. यामध्ये तीन किराणा विक्रेत्यांसह एक फोटोशॉप, एक इलेक्ट्रीक शॉप या व्यावसायिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते. असे असताना वाडी येथे सोमवारी बाजार पेठेतील काही व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली असता ग्रामपंचायत तसेच मंडल अधिकारी महसूल विभागाच्या पथकाने त्याठिकाणी धडक देत कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी बाजार पेठेतील तीन किराणा विक्रेते, एक फोटोशॅाप व एक इलेक्ट्रीक दुकान सुरू होते. या पाच जणांवर प्रत्येकी पाच हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नियम पाळण्याबाबत योग्य ती समज देण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंग बांदल व तहसीलदार आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी अशोक गुजर, सरपंच अनिता ठाकरे, उपसरपंच अनिता पाटील, भरत भिल, जितू पाटील, शिरपूर पोलीस स्थानकाचे कर्मचारी एन. बी. सोनवणे, एच. एस. शेख, जी. जी. सोनवणे, होमगार्ड संजय कोळी, पोलीसपाटील गोपाल कोळी कारवाई प्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Five traders in Wadi fined Rs 5,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.