शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

दुचाकी रॅलीतून पाच तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:56 AM

आग्रा रोडवरील घटना : आझादनगर पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देआझादनगर पोलिसांनी ५ तलवारी जप्त केल्याशिवजयंतीनिमित्त आयोजित दुचाकी रॅलीतील घटनासंबंधितांवर लवकरच कारवाई होण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिवजयंतीचे औचित्यसाधून शहरात बहुसंख्य तरुण दुचाकीने रॅली काढत जनजागृती करत आहेत़ आग्रा रोडवरुन निघालेल्या  दुचाकीस्वारांच्या  रॅलीत सहभागी तरुणांकडून आझादनगर पोलिसांनी ५ तलवारी जप्त केल्या़ ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली़ शिवजयंतीचे औचित्यसाधून सोमवारी सकाळपासून शहरातील विविध मार्गावर दुचाकीस्वार एकत्र येऊन रॅली काढत आहेत़ ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष केला जात होता़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आहे़  दुपारी आग्रा रोड वर दुचाकीस्वारांची रॅली फिरत असताना काही तरुणांजवळ तलवारी आढळून आल्या़ तलवारीच्या जोरावर हे तरुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते़ ही बाब पोलिसांच्या निदर्शनात आली़ लागलीच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार आणि पोलिसांच्या पथकांने या तरुणाला हेरले़ त्यांच्याकडून ५ तलवारी जप्त करण्यात आल्या असल्या तरी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही असे पोलिसांनी सांगितले़