धुळ्यात पाच ठिकाणी घरफोडय़ा!
By Admin | Updated: May 9, 2017 18:39 IST2017-05-09T18:39:10+5:302017-05-09T18:39:10+5:30
नूतन पोलीस अधीक्षक यांच्यासमोर आव्हान : घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसात नोंद

धुळ्यात पाच ठिकाणी घरफोडय़ा!
धुळे,दि.9- शहरातील नकाणे रोडलगत असलेल्या साईदर्शन कॉलनी भागात एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरटय़ांनी घरफोडी केली आह़े चोरटय़ांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, या घटनांची नोंद देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आह़े
नकाणे रोडलगत असलेल्या साईदर्शन कॉलनीतील रहिवाशी रात्री घराच्या छतावर झोपलेले असल्याची संधी साधून चोरटय़ांनी या घरफोडय़ा केलेल्या आहेत़ चोरटय़ांनी योगेश काशिनाथ पाटील यांच्या घरातून 11 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 12 हजार रुपयांची रोकड़ दगडू साहेबराव पाटील यांच्याकडे चोरीचा प्रयत्न झाला आह़े सुदैवाने कोणत्याही प्रकारचा ऐवज लंपास होऊ शकलेला नाही़ अमोल पवार यांच्या घरातून 4 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत़ हर्षा विनायक पाटील यांच्या घरातून 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 6 हजार रुपयांची रोकड लंपास झाली आह़े तर प्रमोद शिवाजी देवरे यांच्या घरात चोरी झाली आह़े पण, नेमक्या कोणत्या वस्तू चोरीस गेले आहेत, ते समजू शकलेले नाही़