नियम तोडणाऱ्यावर पाच मिनिटांत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:11 IST2019-11-20T23:09:17+5:302019-11-20T23:11:53+5:30
चलनव्दारे दंडात्मक कारवाई

Dhule
चंद्रकांत सोनार।
धुळे : महामार्गावर होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळ्यातील महामार्ग वाहतूक पोलिसांना स्पीडगन कॅमेºयासह सुसज्ज इंटरसेप्टर व्हेइकल अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे़ या वाहनाव्दारे गेल्या तीन दिवसांत चार चालकांवर अवग्या पाच मिनिटांत ई-चलनव्दारे दंडात्मक कारवाई केली आहे़
पाच वाहनांचा समावेश
महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत महा मार्गावर होणाºया अपघाताच्या नियंत्रणासाठी महामार्ग पोलिसांना स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित इंटरसेप्टर व्हेइकल वाहन देण्यात आले आहे़ त्यात उत्तर महाराष्ट्रात धुळे, चाळीसगाव, पाळधी, शिरपूर तसेच विसरवाडी अशा पाच ठिकाणी अत्याधुनिक वाहन देण्यात आले आहे़
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
नाशिक येथेील कार्यक्रमात महामार्ग पोलिसांना इंटरसेप्टर व्हेइकल वाहन शनिवारी सोपविण्यात आले़ त्यासाठी धुळे महामार्ग वाहतूक पोलीस शाखेतील ३० ते ३५ अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई करणारे वाहतूक पोलीस चार दिवसापासून आग्रा-मुंबई महामार्गावर नव्या वाहनात स्पीडगन ठेवून कारवाई करीत आहे़ त्यामुळे आता वाहन चालकांवर आता यंत्राची नजर राहणार आहे़
पाच मिनिटात झाला दंड
अत्याधूनिक वाहनाव्दारे आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाºया वाहनांचा वेग मयादेपेक्षा जास्त आढळून आला़ व्हेइकल कॅमेºयाव्दारे स्पीट जास्त असल्याने महामार्ग वाहतूक नियम तोडणाºया चार वाहनाच्या क्रमांकानुसार पाच मिनिटात थेट ई-चलनव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात आली़
या ठिकाणी असेल वॉच
महामार्ग पोलीस आग्रा-मुंबई महामार्गावरील सरवड फाटा, औरगाबाद चौफुली, रोकडोबा, आर्वी, लळीग किल्ला, पारोळा चौफुलीसह अन्य ठिकाणीव्हॅन सकाळी ते सायकाळ पर्यत महामार्गावर नियम तोडणाºया दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांवर लक्ष देत आहे़
असा होईल इंटरसेप्टर व्हेइकलचा फायदा
या वाहनांमध्ये ब्रिथ अॅनालायझरची यंत्रणाही बसविलेली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्य प्राशन केले, याचा अहवालही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांना चांगलाच चाप बसणार आहे. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाºयांवर कारवाई करणे, त्यांना पुराव्यासह ओळखणेही सुलभ होणार असून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.
मद्यापींवर असेल लक्ष
मुंबई-आग्रा महामार्गावर महामार्ग पोलीसांनी केलेल्या कारवाई काही वाहनांचा स्पीड मर्यादा तर काही वाहनांचे ७५ मायक्रॉनपेक्षा कमी काळी फिल्म वाहनांच्या काचाना बंदी असतांना लावलेल्या आढळून आले़
या चालकांवर होईल कारवाई
महामार्ग पोलीसांना दिलेल्या अत्याधुनिक वाहनांच्या स्पीडगनद्वारे रोडवर लेझरचा पॉइंट निघतो. त्याच पॉइंटच्या आधाराने वेगाने वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणाºयांना याद्वारे अचूक टिपले जाणार आहे. वाहन क्रमांकाच्या आधारे सर्व्हरद्वारे त्याची आरटीओकडे असलेल्या माहितीच्या आधारे वाहतुकीचे नियम तोडणाºया संबंधिताच्या मोबाइलवर पाच मिनिटांमध्येच ई-चलनाच्या कारवाईचा संदेश दिला जाणार आहे़