लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील चाळीसगाव रोडवरील जामचा मळा भागातील एका गॅरेजला लागलेल्या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली़ चाळीसगाव रोड जामचा मळा परिसरातील गॅरेजला आग लागली होती़ यामुळे जवळच्या इतर तीन दुकानांना देखील आग लागली़ यात तीन मोटरसायकल, एक कार गॅरेजमधील साहित्य असे जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़मुबारक आॅटो गॅरेज, हाफिज मोटार गॅरेज आणि अन्य एका शेडमध्ये आग झाल्याचे कळताच गॅरेज मालकांसह कारागिरांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली़ दरम्यान, काहींनी अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीबाबत माहिती दिली़ मनपाच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी आग आटोक्यात आणली़ बंब दाखल होण्याआधी नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला़ या प्रयत्नात गॅरेजचे मालक आणि कारागिर असे दोघे जखमी झाले़ त्यांचे हात भाजले आहेत़ घटनास्थळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले़दरम्यान, घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून अग्नीशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले़गॅरेजला आग लागल्याचे त्वरीत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला़ पहाटेच्या सुमाराला लागलेल्या या आगीकडे दुर्लक्ष झाले असते तर गंभीर घटना घडण्याची शक्यता होती़ या भागात गॅरेजची संख्या जास्त आहे़ शिवाय हे गॅरेज जवळ जवळ आहेत़ त्यात दरुस्तीची वाहने असतात़ वाहनांमध्ये पेट्रोल, डीझेल, आॅईल मोठ्या प्रमाणावर असते़ आग वाढली असती तर संपूर्ण परिसरात अग्नीतांडव घडले असते असे जाणकारांनी सांगितले़आग नेमकी कशामुळे याचे कारण समजु शकले नाही़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांचा तपास सुरू आहे़दरम्यान, आग लागल्याची बातमी वाºयासारखी पसरल्याने बघ्यांची तसेच मदत करणाºयांची गर्दी झाली होती़ आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले़गॅरेजला आग लागल्याचे लक्षात येताच अग्नीशमन दलास माहिती दिली़ बंब दाखल होण्याच्या आधी आग विझविण्याचा प्रयत्न करणारे गॅरेज मालक मुबारक शेख आणि कर्मचारी सलाउद्दीन शेख या दोघांचे हात भाजले़
धुळ्यात गॅरेजला आग पाच लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:59 IST