स्त्री रुग्णालयात पहिली प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:31+5:302021-01-21T04:32:31+5:30
येथील - जिल्हा रुग्णालयात सुरु झालेल्या स्त्री व बाल रुग्णालयातील पहिली प्रसूती मंगळवारी मध्यरात्री झाली. आई व नवजात बालकाची ...

स्त्री रुग्णालयात पहिली प्रसूती
येथील - जिल्हा रुग्णालयात सुरु झालेल्या स्त्री व बाल रुग्णालयातील पहिली प्रसूती मंगळवारी मध्यरात्री झाली. आई व नवजात बालकाची प्रकृती उत्तम आहे. स्त्री रुग्णालयात जन्माला आलेले पहिले बाळ मुलगी आहे. प्रसूतीवेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे उपस्थित होत्या. बालक व त्याच्या आईची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भामरे यांच्यासमवेत बालरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन चित्तम, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गीतांजली सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.महाले, प्रतिभा घोडके व इतर अधिपरिचारिका प्रसूतीवेळी उपस्थित होते.
रुकसार बानो सलमान बेग मिर्झा या २५ वर्षीय महिलेने मंगळवारी रात्री १ वाजून ४८ मिनिटांनी मुलीला जन्म दिला. ही जिल्हा रुग्णालयात सुरु झालेल्या स्त्री रुग्णालयातील पहिली प्रसूती ठरली आहे. नवजात बालकाचे वजन साडेतीन किलो इतके आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील इमारतीमध्ये स्त्री व बाल रुग्णालय सुरु होणार आहे. तोपर्यंत स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालयात सुरु झाले आहे. इमारत दुरुस्तीनंतर स्वतंत्र ठिकाणी स्त्री व बाल रुग्णालय सुरु होणार आहे.