सीए परीक्षेत दर्शन कुचेरिया धुळे केंद्रात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:29+5:302021-02-05T08:46:29+5:30
धुळे येथेही २ परीक्षा केंद्र देण्यात आली होती. धुळ्यात नवीन अभ्यासक्रमानुसार ९७ व जुन्या अभ्यासक्रमानुसार २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

सीए परीक्षेत दर्शन कुचेरिया धुळे केंद्रात प्रथम
धुळे येथेही २ परीक्षा केंद्र देण्यात आली होती. धुळ्यात नवीन अभ्यासक्रमानुसार ९७ व जुन्या अभ्यासक्रमानुसार २९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी दोन्ही गटात पास होऊन सीए पूर्णतः उत्तीर्ण झाले, तर ५ विद्यार्थी पहिल्या गटात व ६ विद्यार्थी दुसऱ्या गटात पास झाले.
जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी दुसऱ्या गटात पास झाले. धुळे केंद्रात दर्शन कुचेरिया ८०० पैकी ५४५ मार्क्स मिळवून पहिला आला.तसेच तो अखिल भारतीय स्तरावरील प्रथम ५० जणांच्या गुणवत्ता यादीत १९ वा आला. तसेच पलश आनंद नहार ४९२ गुण मिळवून धुळ्यात दुसरा आला व भूषण बालमुकुंद शर्मा पाचवा आला. धुळ्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धुळे सीए शाखेचे अध्यक्ष नीलेश अग्रवाल, सचिव अविनाश घुंडीयाल, माजी अध्यक्ष राजाराम कुलकर्णी, खजिनदार नीलेश के. अग्रवाल व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सीए रचेंद्र मुंदडा यांनी कौतुक केले आहे.