शिवरंग चित्रकला स्पर्धेत वेदांत सोनवणे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:01 IST2020-02-24T12:00:36+5:302020-02-24T12:01:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : युवक स्वराज ग्रुप धुळे आयोजित शिवरंग चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी दगडी ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : युवक स्वराज ग्रुप धुळे आयोजित शिवरंग चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी दगडी शाळेच्या मैदानावर सुरु असलेल्या किल्ले प्रदर्शन स्थळी पार पडला़ त्यात जयहिंद शाळेचा वेदांत धनजंय सोनवणे प्रथम, आदर्श प्राथमिक शाळेचा रेहान खान पठाण द्वितीय, तर सेन्ट अॅण्ड इंग्लिश स्कूलचा क्रिश संजय पाटील याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले़
या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक, सन्मान पत्र व महाराजांचे पुस्तक देऊन गौरवण्यात आले़