हॉटेलवर गोळीबार : दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 1, 2014 00:06 IST2014-06-01T00:06:59+5:302014-06-01T00:06:59+5:30

धुळे : महामार्गालगत असलेल्या हॉटेल प्रियंकावर चार संशयितांनी शुक्रवारी रात्री दरोडा टाकल्याप्रकरणी अज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Firing at hotel: Filed under dacoity | हॉटेलवर गोळीबार : दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

हॉटेलवर गोळीबार : दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

 धुळे : फागणे शिवारातील महामार्गालगत असलेल्या हॉटेल प्रियंकावर चार संशयितांनी शुक्रवारी रात्री साडेदहानंतर दरोडा टाकल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चौघा दरोडेखोरांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांकडून तपासाला दिशाच नसल्याचे चित्र आहे. पोलीस सूत्रांनुसार माधव एकनाथ राजपूत (३०, रा. इंद्रप्रस्थनगर, देवपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ३० रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास हॉटेल प्रियंका येथे जेवण आटोपून राजपूत हे पत्नी व वहिनी यांना घेऊन कारने निघत होते. त्यापूर्वीच पाच ते साडेपाच फूट उंचीचे, तोंड आणि डोके रूमालाने झाकलेल्या तसेच हातात लांब नळीच्या दोन व दोन लहान बंदूकधारी, असे चौघे हिंदी भाषिक दरोडेखोर तेथे दाखल झाले. चौघांपैकी एकाने हातातील लोखंडी पाईपने माधव राजपूत यांना मारहाण केली तर दोघा दरोडेखोरांनी प्रीती राजपूत व दीपाली राजपूत यांच्या गळ्यातील सोनपोत तसेच पर्समधील पाच हजार रुपये रोख हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने त्यांचा थरकाप उडाला. या वेळी चौघांपैकी एकाने थेट गोळीबार करीत दहशत निर्माण केली व लूटमार करत घटनास्थळावरून पोबारा केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत राजपूत कुटुंबीय किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भादंवि ३९४, ४२७, ३४ सह आर्म अ‍ॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत.

Web Title: Firing at hotel: Filed under dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.