धुळे येथे चारा गोडावूनला आग

By Admin | Updated: May 27, 2017 15:36 IST2017-05-27T15:36:50+5:302017-05-27T15:36:50+5:30

तिरंगा चौकातील घटना : सहा बंबच्या दोन फे:या, आग विझविण्यासाठी सर्वाचाच प्रयत्न

Fires fire on Dhule | धुळे येथे चारा गोडावूनला आग

धुळे येथे चारा गोडावूनला आग

>ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.27 - शहरातील तिरंगा चौकातील दाट वस्तीत असलेल्या चा:याच्या गोडावूनला शुक्रवारी आग लागली़ सहा बंबांनी प्रत्येकी दोन फे:या करून आग विझविली़ आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविल्याने व गोडावूनमधील सिलींडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली़ 
शहरातील तिरंगा चौकातील फिरदोस नगरात अब्दूल हसन यांचे पत्र्याच्या शेडमध्ये चा:याचे गोडावून आह़े बाजुलाच त्यांचे वेल्डींग वर्कशॉप देखील आह़े शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास  गोडावूनमध्ये अचानक आग लागली़ काही क्षणातच आगीने रौद्ररूपधारण केल़े घटनेची माहिती मिळताच मनपा अगAीशमन विभागाचे एका पाठोपाठ पाच बंब दाखल झाल़े तसेच टोल प्लॉझा कंपनीचाही बंब आला़ त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला़ मात्र नारिकांची प्रचंड गर्दी झाल्याने अडचणी येत होत्या़ सहा बंबांनी प्रत्येकी दोन फे:या करून आग विझविली़ 

Web Title: Fires fire on Dhule