दसेरा मैदानाजवळ उद्यानाला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:06 IST2020-03-21T13:05:43+5:302020-03-21T13:06:17+5:30
दसेरा मैदानाजवळ उद्यानाला लागली आग लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील दसेरा मैदानाजवळील उद्यानाला आग लागताच महापालिकेच्या बंबांनी ती ...

dhule
दसेरा मैदानाजवळ उद्यानाला लागली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील दसेरा मैदानाजवळील उद्यानाला आग लागताच महापालिकेच्या बंबांनी ती आटोक्यात आणण्यात आली़ गर्दी जमा झाली होती़
दसेरा मैदान परिसरात असलेल्या महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर विकसित केलेल्या उद्यानाला शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ कोणीतरी पेटती काडी अथवा बिडी याठिकाणी फेकली आणि कोरडा पाला जळाल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा होती़ ही आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्नीशमन बंबाने ४ फेऱ्या केल्या़ परिणामी आग आटोक्यात आली़ यात १५ ते २० लाखांचे नुकसान झाले़
सुमारे दीड ते दोन तास आग या ठिकाणी धुमसत होती़ उद्यानात तयार करण्यात आलेल्या बांबुच्या झोपड्या, टायर लावून करण्यात आलेले सुशोभिकरण, फुलांची झाडे-झुडूपे या आगीत जळून खाक झाले़ या आगीमुळे परिसरात बराचवेळ धुराचे लोळ दिसत होते़ या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़