गोंदूर विमानतळात धावपट्टीजवळ आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 22:04 IST2020-04-10T22:04:42+5:302020-04-10T22:04:54+5:30
अग्नीशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल

गोंदूर विमानतळात धावपट्टीजवळ आग
धुळे : शहरासह परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या़
गुरूवारी दुपारी गोंदूर विमानतळ परिसरात गवताने पेट घेतल्याने आग लागली़ एक प्रकारे वणवा पेटला होता़ अग्नीशमन दलाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग अटोक्यात आणली़
अन्य एका घटनेत देवपूरातील मराठा बोर्डींगजवळ कचराकुंडीलाही आग लागली होती़ या ठिकाणी ट्रकसह अनेक टेम्पो उभे असल्याने धोका होता़ परंतु अग्नीशमन दलाने आग विझविल्याने मोठी हानी टळली़ साक्री रोडवरील एका हॉटेजवळ कारला आग लागल्याची माहिती मिळाली़