कापडणे येथील आगीत संसारपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 12:23 IST2017-04-02T12:23:37+5:302017-04-02T12:23:37+5:30

कापडणे येथील दत्तात्रय देवराम माळी यांच्या घराला रविवारी सकाळी 10.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.

The fire in Kalpana is located in the fire | कापडणे येथील आगीत संसारपयोगी साहित्य खाक

कापडणे येथील आगीत संसारपयोगी साहित्य खाक

 धुळे,दि.2- तालुक्यातील कापडणे येथील दत्तात्रय देवराम माळी यांच्या घराला रविवारी सकाळी 10.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचा:यांना आग विझविण्यात यश आले आहे.

कापडणे येथील दत्तात्रय माळी हे सकाळी कुटुंबातील सदस्यांसह शेतात गेले होते. या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे अचानक सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास आग लागली. आगीमुळे धुर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाचा बंब बोलविला. धुळे येथून अग्निशमन विभागाचा बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. कर्मचा:यांनी ही आग विझवित आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र आगीत संसारपयोगी साहित्य मात्र जळून खाक झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आगीचा पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

Web Title: The fire in Kalpana is located in the fire