जिनिंगला आग, लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:48 IST2020-12-03T11:48:04+5:302020-12-03T11:48:17+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क दोंडाईचा : येथील धुळे रस्त्यावर असलेल्या अभिषेक जिनिंगला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. यात ...

Fire to Jinning, loss of millions | जिनिंगला आग, लाखोंचे नुकसान

dhule

 लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : येथील धुळे रस्त्यावर असलेल्या अभिषेक जिनिंगला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. यात कापसाच्या १०० गाठी व मशिनरी जळून खाक झाल्या. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशनला रात्री उशीरापर्यंत आगीची नोंद झाली नव्हती.
दोंडाईचा- धुळे रस्त्यावर उपनगराध्यक्ष रवि उपाध्ये यांची अभिषेक जिनिंग आहे.या जिनिगचा गोडाऊनमध्ये कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या असून त्या बाजूला मशिनरी आहे.
बुधवारी जिनिगमध्ये काही मजूर काम करीत होते. जिनिगला सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत कापसाच्या सुमारे शंभर गाठी जळाल्या. तर मशिनरीही जळाल्या या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आग विझविण्यासाठी दोडाईचा, शिंदखेडा, धुळे, नंदुरबार नगरपालिकेचा अग्निशमन गाड्यांची आग विझवली आगीत सुदैवाने जीवीत हानी झालेली नाही. घटना स्थळी पोलीसांनी भेट देवून पहाणी केली. दोडाईचात दोन जिनीग असून दोडाईचातील जिनिगला आग लागल्याची ही पाचवी घटना आहे .

Web Title: Fire to Jinning, loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.