धुळ्यात घरांना आग, लाखो रुपयांचे नुकसान
By Admin | Updated: February 1, 2017 07:03 IST2017-02-01T06:50:41+5:302017-02-01T07:03:05+5:30
शहरातील रमजान बाबा नगर ऐंशी फुटी रस्तावरील घरांना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

धुळ्यात घरांना आग, लाखो रुपयांचे नुकसान
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 01 - शहरातील रमजान बाबा नगर ऐंशी फुटी रस्तावरील घरांना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी महानगरपालिकेचे चार बंब दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले.
रमजान बाबा नगर ऐंशी फुटी येथील गनीशहा बिसमिल्लाशहा, अब्दूल लतीफ शेख लाल , अख्तर शेख लतीफ शेख, फिरोजाबी बिसमिल्ला शेख आणि शाहबानशेख रमजान यांच्या घरांना ही आग लागली होती. ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संसारोपयोगी वस्तूंसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त केला होता. तसेच, माजी उपमहापौर डॉ. फारूक शहा, माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, पो. नि. रमेशसिंग परदेशी यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.