धुळ्यात गिंदोडीया कंपाउंडला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 21:51 IST2020-05-31T21:50:33+5:302020-05-31T21:51:34+5:30
धुळे : मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाउंडमध्ये लाग लागल्याचे कळताच महापालिका अग्नीशमन विभागाला कळविण्यात आले़ ३ बंबाच्या १० फेऱ्यांनी लागलेली ...

dhule
धुळे : मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाउंडमध्ये लाग लागल्याचे कळताच महापालिका अग्नीशमन विभागाला कळविण्यात आले़ ३ बंबाच्या १० फेऱ्यांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यात विभागाला सायंकाळी उशिरा यश आले़
शहरातील मालेगाव रोडवर गिंदोडीया परिवाराचा एक मोकळी जागा आहे़ याठिकाणी गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे़ याच गवताला रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ आग सुरुवातीला लहान स्वरुपात होती़ पण, वाळलेले गवत आणि वाºयामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले़ घटनेचे गांभिर्य ओळखून महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला माहिती देण्यात आली़ विभाग प्रमुख तुषार ढाके व पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले़ ३ बंबांनी एका पाठोपाठ १० फेºय करुन आग विझविली़ आग विझली असलीतरी त्याची दाहकता रात्री उशिरापर्यंत कायम होती़