धुळे शहरात चार ठिकाणी आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 21:36 IST2020-04-25T21:35:44+5:302020-04-25T21:36:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शहरात विविध चार ठिकाणी किरकोळ आग लागल्याच्या घटना घडल्या़ अग्नीशमन दलाच्या बंबांनी त्वरीत घटनास्थळी ...

धुळे शहरात चार ठिकाणी आग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात विविध चार ठिकाणी किरकोळ आग लागल्याच्या घटना घडल्या़ अग्नीशमन दलाच्या बंबांनी त्वरीत घटनास्थळी पोहोचून आग अटोक्यात आणली़
साक्री रोडवरी जे़ के़ ठाकरे हॉस्पिटलजवळ ट्रान्सफार्मरला आग लागली होती़ गुरूशिष्य स्मारक आणि मुख्य टपाला कार्यालयाशेजारी असलेल्या कचऱ्याला आग लागली़ या तीन ठिकाणची आग किरकोळ होती़ परंतु झाशी राणी चौकात एका दुकानातील इन्व्हर्टरला लागलेली आग तिव्र होती़ त्यावर नियंत्रण मिळविले नसते तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती़ अग्नीशमन दलाने त्वरीत आग विझविली़