धुळ्यात पानटपरीला आग, आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 12:02 IST2019-02-10T12:01:31+5:302019-02-10T12:02:23+5:30

साक्री रोडवरील घटना : अग्नीशमन बंबामुळे आग आटोक्यात

Fire at Dhuntala, financial losses | धुळ्यात पानटपरीला आग, आर्थिक नुकसान

धुळ्यात पानटपरीला आग, आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री रोडवर डॉ़ ठाकरे यांच्या दवाखान्यासमोर असलेल्या पानटपरीला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली़ अग्नीशमन बंबाने आग विझविण्यात आली़ सुदाम सदाशिव गोंधळी (३९, रा़ यशवंत नगर, साक्री रोड, धुळे) यांच्या मालकीच्या टपरीत असलेले २५ हजार रुपये रोख आणि अन्य ५ हजाराचे साहित्य जळून खाक झाले़ दरम्यान, टपरीनजिक असलेला कचरा आणि लाकडांमुळे आगीने रौद्ररुप धारण केले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ याप्रकरणी शहर पोलिसात रविवारी सकाळी अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली आहे़ पुढील तपास सुरु आहे़ 

Web Title: Fire at Dhuntala, financial losses

टॅग्स :Dhuleधुळे