धुळे एमआयडीसीत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:47 IST2020-05-24T21:46:54+5:302020-05-24T21:47:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : अवधान एमआयडीसी येथील भांडे तयार करुन पॉलिश करुन देणाऱ्या फॅक्टरीला अचानक आग लागली़ यात ...

Fire at Dhule MID | धुळे एमआयडीसीत आग

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अवधान एमआयडीसी येथील भांडे तयार करुन पॉलिश करुन देणाऱ्या फॅक्टरीला अचानक आग लागली़ यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले़
दरम्यान, फॅक्टरीचे मालक बाहेरगावी असल्यामुळे नेमके काय जळाले आणि कितीचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकलेली नाही़
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान एमआयडीसी येथील सेक्टर डीमधील जैन यांचे भांडी तयार करुन त्यांना पॉलीश करुन देणारी फॅक्टरी आहे़ यातील गोडावूनला अचानकपणे आग लागली. या आगीत भांड्यांना पॉलीश करुन देण्याची सामुग्री जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
या आगीत लाकडी कॅबीनसह त्यात ठेवलेले कागदपत्रे, अन्य साहित्य जळून खाक झाले आहेत़ आगीची माहिती अग्नीशमन विभागाला कळताच तीन बंबाच्या मदतीने तुषार ढाके, राजन महाले, अतूल पाटील यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ सुदैवावाने जिवीतहानी झाली नाही.
दरम्यान, मोहाडी पोलिस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Fire at Dhule MID

टॅग्स :Dhuleधुळे